0
BY - युवा महाराष्ट्र लाइव -  सोलापूर

आरक्षण या प्रश्नाचे राजकारण होत आहे. त्यातून जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे काम होते. यातून या देशातील लोकशाही धोक्यात येणार आहे. त्यामुळे आरक्षण द्यायचेच असेल तर सर्वांना आर्थिक निकषांवर द्यावे, अन्यथा सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापुरात केली. सिद्धयेश्वर मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच राजकीय स्वार्थांसाठी जातींचा आधार घेतला जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Post a comment

 
Top