0
BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव -  मुंबई ।
जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय शिवनगर (रेठरे बुद्रुक, ता. कराड) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांची हेलिपॅडजवळ भेट घेतली. विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता वाढली असून ते नेमकी काय भूमिका घेणार याची उत्सुकता लागली आहे. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी बुके देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
त्यानंतर त्यांनी मेडिकल कॉलेज मधील पदनिर्मिती, एमआयडीसी मध्ये मोठी कंपनी आणून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करावी याबाबतचे निवेदन दिले.त्याच बरोबर सातारा शहराची रखडलेली हद्दवाढीबाबत सुद्धा चर्चा झाली. येत्या अधिवेशनात या मुद्यावर आवाज उठवणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. आमदार शिवेंद्रराजे आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीमुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. साताऱ्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा आता शिवेंद्रसिंहराजे यांच्या भूमिकेकडे लागल्या आहेत.

Post a Comment

 
Top