0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
शासकीय कर्मचाऱ्यांना जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ असायची, मात्र आता या दुपारच्या सुटीवर गंडांतर आले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासातच जेवण उरकावे, असा शासन आदेशच निर्गमित करण्यात आला आहे. राज्य शासनाने याबाबतचा ४ जूनला हा शासन आदेश जारी केला आहे.जेवणाची सुटी तासभर असली तरी अर्ध्या तासात जेवण उरकावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सूचनांचे पालन नियमित होण्यासाठी खबरदारी घ्यावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.कर्मचाऱ्यांना सध्या सर्वत्र दुपारी एक ते दोन जेवणाची सुटी दिली जाते. मात्र, 21 ऑगस्ट 1988च्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयीन वेळेत दुपारच्या भोजनासाठी अर्ध्या तासाची सुटी आहे. हे निदर्शनाला आणण्यात आले आहे. अनेक ठिकाणी नागरिक सरकारी कार्यालयात आपल्या तक्रारी घेऊन आल्यास त्यांना अनेकदा अधिकारी आणि कर्मचारी दुपारच्या वेळेत उपलब्ध होत नाहीत. तसेच अनेकदा जेवणाच्या सुटीच्या नावाखाली कार्यलयात अनुपस्थित असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. त्यामुळे हा संबंधित आदेश जारी करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागातल्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Post a Comment

 
Top