0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - जळगाव
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाजवळ बॉम्बसदृश्य वस्तू असल्याची अज्ञातांनी जळगाव पोलीस नियंत्रण कक्षासह जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने परिसर पिंजून काढला. मात्र, कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही.फेक कॉल करून अफवा पसरवत घाबराहट निर्माण करणाऱ्यांवर कारवाई ची मागणी गिरीश महाजन यांच्या स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनी केली आहे. 

Post a Comment

 
Top