0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - अहमदनगर ।
मुलगी शिकली प्रगती झाली ही म्हण तर आपण एैकलीच असेल परंतू वास्तुस्थिती पाहिली तर आजच्या मुलींनी ती खरी करून दाखवली आहे.शिक्षणात गगन भरारी घेताना आज कित्येक मुली,महिला पुढे गेल्या आहेत.याचेच उदाहरण द्दयायचे झाले तर लहुजी शक्ती सेनेचे अहमदनगर जिल्हाकार्याध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुनिल सकट यांची कन्या आरती सुनिल सकट व ठाणे जिल्हयातील निर्भिडपणे सत्याची भुमिका मांडून आपले संपुर्ण आयुष्य जनतेच्या कल्याणासाठी अर्पण करणारे मुरबाडचे ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांची कन्या नंदिनी शेलार यांचे आहे.वडिल धार्‍यांचा मान राखुन कर्तव्याची जाण असणार्‍या या दोघी कन्यांनी बारावी परिक्षेत उत्तीर्ण होऊन यशस्वी बाजी मारली आहे.मुरबाड सारख्या ग्रामीण भागातुन नंदिनी शेलार हिने विज्ञान शाखेतुन पास झाल्याची बातमी कळताच लहुजी शक्ती सेनेचे अहमदनगर जिल्हाकार्याध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुनिल सकट यांनी तिचा सत्कार करून पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.जिद्दीची कसोटी पार करून यशावर प्राभुत्व मिळवणार्‍या आरती सुनिल सकट हिचाही मुरबाड विकासमंच ट्रस्टीकडून सत्कार करून गौरविण्यात आले आहे.यावेळी ट्रस्टीचे उपाध्यक्ष वसंत भगत,खजिनदार मिलींद दळवी,ठाणे जिल्हा महिलाउपाध्यक्षा दिपाली दळवी व अन्य ट्रस्टीचे मान्यवर,कार्यकर्ते,पदाधिकारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

 
Top