0
BY - युवा महाराष्ट्र लाइव -  नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे पहिले अधिवेशन आहे. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत देणाऱ्या एनडीएच्या नेत्यांची रविवारी बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत संसद अधिवेशनाची रणनीति, संचालन आणि सरकारकडून कोणते महत्त्वाचे विधेयक मांडण्यात येणार आहेत यावर चर्चा झाली. 4 जुलै रोजी आर्थिक सर्वेक्षण 5 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अधिवेशनात तिहेरी तलाकबंदी विधेयक आणि यासोबतच किमान दहा विधेयके मांडण्यात येणार आहेत.

Post a Comment

 
Top