0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली

‘वायु’ चक्रीवादळाने रात्रभरात आपला रस्ता बदलला आहे. आता हे वादळ अरबी समुद्रातच घोंघावणार आहे. यामुळे गुजरामधील या वादळाचा धोका कमी झाला आहे. मात्र वादळ आले तर त्याच्या परिणामांना तोंड देण्याची प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र या क्षेत्रात वेगाने वारे वाहू शकतात. तर पुढील 24 ते 48 तास समुद्र खवळलेला राहणार आहे.वायू चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीसह गुजरातला धडकणार होते. वायू चक्रीवादळ गुजरातच्या उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता वायू चक्रीवादळाने दिशा बदलली असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वायू चक्रीवादळ अरबी समुद्रात घोंगावणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्यावर ताशी 155 ते 165 किमी वेगाने वारे वाहात आहेत.

Post a Comment

 
Top