0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

काही दिवसांपूर्वीच देशाने फनी चक्रीवादळाने घडवलेला विध्वंस पाहिलेला आहे. आता प्रचंड उकाड्याने सर्वसामान्य हैराण असताना आणखी एक चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले आहे. वायू नावाचे हे चक्रीवादळ लवकरच गुजरातच्या किनाऱ्याला धडकणार आहे. हवामान विभागानुसार, 12 ते 13 जूनपर्यंत वायू चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकेल. चक्रीवादळ पोहोचण्यापूर्वी महाराष्ट्राच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई एअरपोर्टवर रात्री 9.30 वाजेनंतर विमान उड्डाणे काही काळासाठी रोखण्यात आली. मुंबईला येणारी विमाने इतर विमानतळांकडे वळवण्यात आली.वायू चक्रीवादळ सध्या गुजरातच्या किनाऱ्यापासून समुद्रात 650 किमी अंतरावर आहे. 110 किमी वेगाने हे वादळ गुजरातच्या दिशेने कूच करत आहे. चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनानेही अलर्ट जारी केला असून प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या 32 पेक्षा जास्त गावांना सतर्क केले आहे.

Post a Comment

 
Top