0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड 

मुरबाड तालुक्यात पावसाचा बहाणाकरून विद्युत मंडळाची बत्ती गुल मालिका सुरू झाली आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षी दररोज दिवस रात्र विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले असून रूग्णांवर उपौचार करण्यास आडथळे निर्माण होत आहेत.पावसाळा सुरू झाला त्याच दरम्यान 10 वी 12 वीचा शालेय निकाल लागला अनेक विद्यार्थ्याना विविध कोर्सला जात असुन अन्य विद्यार्थी पुढील शालेय प्रवेशासाठी शालेय दाखले काढतात ऑनलार्इन फॉर्म भरतात त्यांना आडथळे आले असुन विद्युत महामंडळाच्या मनमानी कारभाराकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाल्याने विद्युत पुरवठा खंडीत होणार्‍या मालिकेवर अद्याप तोडगा निघालेला नाही.कृषी उत्पन्न बाजार समितीसह अन्य ठिकाणी विद्युत चोरी झाली आहे.त्याला विद्युत महापारिषण उपअभियंता मुरबाड विभाग प्रमूख अधिकारी जबाबदार आहेत.पावसाळा सुरू झाला असताना रस्त्यावरील विद्युत पोलावर पडणारी झाडे तोडलेली नाहीत दरवर्षी विद्युत तारा पोल पडुन मोठया प्रमाणात जिवीत हाणी व अर्थिक नुकसान होतय याकडे लक्ष वेधण्याची मांगणी होत आहे.

Post a Comment

 
Top