0
BY – यासिन आतार,युवा महाराष्ट्र लाइव – मोहोळ |
मोहोळ येथील भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार लेखी तोंडी तक्रारी करूनही न्याय  मिळत नसल्याने भूमी अभिलेख कार्यालय समोर आत्महत्या करून जीवन संपवण्याचा प्रयत्न एकाने केला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नामदेव तुकाराम खताळ वय ५० रा. बिटले असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

          बिटले तालुका मोहोळ येथील नामदेव तुकाराम खताळ यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती व २७ मे रोजी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार अमोल देशपांडे, भूमी अभिलेख अधिकारी काडगावकर, मोजणीदार राऊत यांनी जातीपातीचे राजकारण करून बनावट कागदपत्रांच्या आधारे संगनमताने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांची दिशाभूल व फसवणूक करून न्यायालयात कागदपत्रे सादर केली यामुळे न्यायालयाने माझ्या विरोधात निकाल दिला आणि माझ्यावर अन्याय केला बेकायदेशीरपणे व आमचे एकतर्फी कारवाई करून आमच्या जमिनीची विल्हेवाट लावली आहे .असे तक्रारदार नामदेव ढसाळ यांचे म्हणणे आहे यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख सोलापुर यांना लेखी निवेदन देऊन न्याय मिळण्यासाठी मागणी केली परंतु त्यांच्याकडून कोणती कारवाई झाली नाही म्हणून निराश होऊन कंटाळून नाईलाजास्तव जीवन संपवण्याची परवानगी मिळावी असा अर्ज देखील केला अन्याया कडे लक्ष वेधण्यासाठी २७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन केले .तरीसुद्धा कोणतीच कारवाई  झाली नाही म्हणून मोहोळ येथील भुमी अभिलेख कार्यालयाच्या दरवाजात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही बाब कार्यालयातील कर्मचारी यांच्या  लक्षात येताच त्यांनी  तातडीने ही बाब पोलिसांना कळवली, पोलिसांना बोलावले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला .या घटनेमुळे खळबळ उडाली आहे .शासकीय कार्यालयाच्या नाकर्तेपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विनाकारण लालसेपोटी भूमी अभिलेख कार्यालय शेतकऱ्याला ' हेलपाटे मारायला लावतात . त्यामुळे चिडून जाऊन खताळ यांनी हा प्रकार केला. या घटनेचा बोध प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. अशी चर्चा उपस्थीतात सुरू होती. याबाबत माहीती देताना भुमी लेखा अभिलेख चे अधीकारी काडगावकर म्हणाले नामदेव खताळ यांच्या जमीनीचा वाद अनेक वर्षापासुन चा आहे आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार जमीन मोजुन दिली व तशा प्रकारची कागदपत्र दिले यावर न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला तो त्यांना मान्य नसेल तर त्यांनी वरच्या न्यायालयात अपील दाखल करून न्याय मागणे अपेक्षीत असताना आम्हाला नाहक त्रास देणे उचित नाही

Post a Comment

 
Top