0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |

आपल्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा परदेश दौऱ्यावर आहेत. ते मालदीवमध्ये पोहोचले आहेत. विमानतळावर मोदींचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी स्वागत केले. हिंद महासागराच्या द्विपसमूहांसोबतचे संबंध मजबूत करणे हा या दौऱ्यामागचा उद्देश आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवद्वारे ‘रुल ऑफ निशान इज्जुद्दीन’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या संसदेत संबोधित करणार आहेत. यासोबतच ते मालदीवमध्ये Coastal Surveillance Radar system चे उद्घाटनही करणार आहेत. यामुळे हिंदी महासागरात इंडियन नेव्हीच्या ताकदीत फायदा होणार आहे.

Post a Comment

 
Top