0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुंबईच्या भांडुप परिसरात गुरुवारी रात्री एका स्थानिक क्रिकेटपटूची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तीन अज्ञातांनी हत्या केल्याचे सांगितले जात आहे. राकेश पवार असे मृत क्रिकेटपटूचे नाव आहे. राकेश पवार (वय 35) हे आपल्या एका मैत्रिणीसह बाइकवरून जात होते. तेवढ्यात भांडुपच्या एलबीएस रोडवर तीन अज्ञात तरुणांनी आवाज देऊन त्यांना थांबवले आणि चाकूने हल्ला चढवला. चाकूने भोसकून तिन्ही अज्ञात आरोपी तेथून पळून गेले. घटनेनंतर राकेश यांना रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीत मृत राकेश यांच्या मैत्रिणीची चौकशी करत आहेत.


Post a Comment

 
Top