0
(फाइल फोटो)
BY - युवा महाराष्ट्र लाइव -  बदलापुर

बदलापुर पूर्व पोलीस ठाण्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून अठरा लाखाचा गुटखा जप्त करून एक रिक्षा टेम्पो जप्त केला आहे. त्याचबरोबर एक गोडाऊन सिल केले आहे. रात्री उशिरापर्यंत अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आणि बदलापूर पूर्व पोलीस ही कारवाई करत होते.या कारवाईत प्रतिबंधीत गुटखा, तंबाखू मसाला, मोठ्या प्रमाणात आढळून आला, त्यात विमल, कोल्हापुरी, तसेच मिराज नावाचे प्रतिबंधीत पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून जप्त करण्यात आले. ही कारवाई बदलपुरपूर्व पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या तीन टाकी परिसरात करण्यात आली.

Post a comment

 
Top