0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
राष्ट्र्वादीच्या सत्ता कायार्काळात शेतक-याच्य नावाने स्वताची झोळी भरून घेणा-या राष्ट्रवादी सत्ताधारी पुढारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्यात अडकले आहेत. त्यांनी स्वताची मालमत्ता म्हणून शासनाचा भुखंड हाडप केला असून हे भामटे विद्युत चोर सिध्द् झाले असल्याने त्यांना विद्युत महामंडळाने दिड लाखाचा दंड ठोठावला आहे. आठवडा बाजार बैलबाजार यावर आपले आयुष्य् जगवणारे स्वताला नेते समजतात मात्र जनतेचया नावावर पुढा-यांनीच दुकानाचे गाळे बळकावले पनन मंडळाचे आदेश ईमारती परवानग्या शासनाचे भुखंड हाडप हे त्याचे कारभार आम्ही उघड केले आहेत आता कृषी उत्पन्न बाजार समितीची सरकारी दवाखान्यासमोरील इमारत शासन जमा होण्यासाठी शासनाकडे फाईल दाखल केली आहे अशा भष्टाचाराला युती शासनाने बळ न देता कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आहे.गाले विक्री,बैलबाजार,आठवडेबाजार भातखरेदीकेंद्र्,रेशनिंग दुकाने , स्वच्छालय , रस्ते , कमाणी  , जेवणावली भत्ते अशा विविध कामात महाभष्टाचार झाला असून शेतक-याच्या नावे चाललेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा काहीही फायदा होत नाही शासनाने मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भष्टाचाराची चौकशी करून प्रभारी सचिव सुधीर मोरे व चेअरमन यांच्यावर फौजदारी खटले दाखल करावे अशी मागणी होत आहे.


Post a Comment

 
Top