0

● आगामी तीन आर्थिक वर्षांत भारताचा विकासदर 7.5 टक्क्यांवर पोहोचेल, जागतिक बँकेने व्यक्त केला अंदाज

● भारतात दरवर्षी हवाप्रदुषणामुळे 5 वर्षाच्या आतील किमान एक बालकांचा मृत्यू होतो असे एका पाहणीत आले आढळून

● यंदा प्रतिष्ठेचा ग्लोबल लीडरशिप पुरस्कार 'गुगल'चे सीईओ असलेले सुंदर पिचाई यांना देण्यात येणार

● पाकिस्तानी लष्कराने स्वेच्छेने लष्करी खर्चात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, पाक पंतप्रधान इमरान खान यांचाकडून निर्णयाचे कौतुक

● बाॅलीवूडमधील दिग्गज अभिनेते आणि नाट्यकलावंत पद्मश्री दिन्यार काँट्रॅक्टर (79) यांचे दीर्घ आजाराने निधन

● राज्यातील सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचा 1 दिवसांचा पगार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय

● 'निपाह' बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू, मात्र विषाणूचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही : आरोग्य विभागाची माहिती

● गुगलने गेल्या महिन्यात लाँच केलेल्या Pixel 3a आणि Pixel 3a XL स्मार्टफोनवर तब्बल 13 हजारांची सूट

● भारताची दक्षिण आफ्रिकेवर 6 विकेट्सनी मात तर न्यूझीलंडची बांगलादेशवर 2 गडी राखून मात

● दाक्षिणात्य अभिनेत्री ईशान्या महेश्वरी 'क्या मस्ती क्या धूम' या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार

Post a Comment

 
Top