0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - झारखंड ।
झारखंडच्या सरायकेला-खरसावां येथे मोठा नक्षलवादी हल्ला झाला आहे. यामध्ये पाच पोलीस जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. झारखंडच्या सरायकेलामध्ये दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांच्या गाडीवर फायरिंग केली. पेट्रोलिंग करणाऱ्या गाडीत 6 पोलीस होते. यामधील पाच जण शहीद झाले आहेत. पश्चिम बंगाल आणि तमाडचा सीमावर्ती भाग तिरुडीह येथील आठवडी बाजारात 7-8 हल्लेखोर दुचाकीवर आले. यानंतर त्यांनी पोलिसांच्या गाडीवर अंधाधुंध गोळीबार सुरू केला. यामध्ये पाच पोलीस जागीच ठार झाले.

Post a Comment

 
Top