0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

राज्याचे पर्यटन आणि रोहयोमंत्री श्री. जयकुमार रावल यांच्याकडे आज अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन ही महत्त्वपूर्ण खाती सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या खात्यांचे मंत्री गिरीश बापट हे आता खासदारपदी निवडून आल्याने त्यांचे पद रिक्त झाले आहे. त्यांच्या उपरोक्त विविध खात्यांचा कार्यभार आज मंत्री श्री. रावल यांच्याकडे तर संसदीय कार्य विभागाचा कार्यभार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मंत्री श्री. रावल यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पर्यटन आणि रोहयो विभागात केलेल्या चांगल्या कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांच्याकडे या महत्त्वपूर्ण खात्यांचा कार्यभार सोपविला आहेमंत्री श्री. रावल हे उच्चशिक्षित असून लंडन येथून त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. मंत्रीपदाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी रोहयो आणि पर्यटन अशा पूर्णतः भिन्न असलेल्या खात्यांमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या निकटवर्ती वर्तुळातील अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात.त्यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी रिक्त झालेली अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन ही खाती त्यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय  घेतला आहे.

Post a Comment

 
Top