0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – शहापुर
मुरबाड ,शहापुर सह सहा तालुक्याचा कारभार असलेल्या आदिवासी विकास महामंडळाच्या शहापूर उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत भात खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार  झाल्याने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे  केली आहे. त्यामुळे ठाणे व पालघर,रायगड जिल्ह्यातील भातखरेदी केंद्रांतील कागदोपत्री होणारी भातखरेदी ,अवाजवी घट, कर्मचा-यांच्या अर्थपूर्ण नियुक्त्या व खरेदीदार संस्थांचे लागेबांधे यावर प्रकाश पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 आदिवासी विकास महामंडळामार्फत एकाधिकार भात खरेदी केंद्रांतून शेतक-यांचा भात (धान) हमीभावाने खरेदी केला जातो.मुरबाड तालुक्यात माळ अदिवासी सेवा सहकारी संस्था आणि दूधनोली अदिवासी सेवा सहकारी संस्थेमार्फत भात करण्यात आली होती ,त्यातील सुमारे 500 पोती भाताची चोरी झाल्याची तक्रार महामंडळने टोकावडे पोलीस ठाण्यात केली आहे ,याबाबत विचारले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांनी महामंडळचे अधिकारी योग्य माहिती आणि तपासात मदत करीत नाही तर महामंडळ चे उपव्यवस्थापकआव्हाड, विनय येडगे यांनी पोलिसांना चोरांची नावे माहिती आहेत मात्र ते योग्य तपास करीत नसल्याचा आरोप केला असल्याने या चोरीचे गूढ कायम आहे तर शहापूर तालुक्यातील ६ केंद्रांवर खरेदी केलेला ८३ हजार ४०५ क्विंटल भात सध्या १२ गोदामांत साठवलेला आहे.मात्र या भातखरेदीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची बाब समोर येत आहे. २०१४-१५ पासून हा गैरव्यवहार सुरु असून आतापर्यंत केवळ दोन सहकारी संस्थांवर वासिंद व टोकावडे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.२००९-१० ते २०१५-१६ या सहा वर्षांत गोदामांच्या भाड्यापोटी ३ कोटी रुपये शहापूर कार्यालयांतर्गत करण्यात आलेला असला तरी महामंडळाकडे प्रत्यक्षात या खर्चाबाबतचा प्रस्तावच सादर केला गेलेला नाही. त्यामुळे या व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा आरोप होत आहे.डोळखांब, मढ-अंबर्जे , किन्हवली येथील भात खरेदी केंद्रांवर भात घेवून येणा-या शेतक-यांसाठी २०१७-१८ मध्ये २ लाख ३४ हजार ५४० रुपये खर्च करुन १५ हजार ६३६ बारदाने (पोती) खरेदी करण्यात आल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात या बारदानांचे वाटपच झाले नसल्याची माहिती शेतक-यांकडून मिळाली.शेतक-यांनी स्वतःच्या बारदानात आपला भात खरेदीकेंद्रावर आणून टाकलेला असतांना शहापूर कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांनी बारदान वाटप, सुतळ खरेदी, हमाली इत्यादी बाबींवर १० लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च केल्याचे कागदोपत्री दाखवून रक्कम परस्पर वाटून खाल्ली असल्याचा आरोप तक्रारदार बबन हरणे यांनी केला आहे.
   भाताची कागदोपत्री खरेदी व प्रत्यक्ष उपलब्ध भात यांत तफावत आढळल्याने २ कोटी रुपयांचा अपहार करणा-या मढ-अंबर्जे सेवा सहकारी संस्थेचे सचिव भरत घनघाव यांचेवर गुन्हा दाखल असतांनाही उपप्रादेशिक अधिकारी विनय येडगे यांनी घनघाव यांच्याच टेंभा-पळशीण सहकारी संस्थेस भात खरेदी करण्यास परवानगी दिल्याने लोकलेखा समितीच्या शिफारशीचाच भंग केल्याचे उघड झाले आहे. शहापूर कार्यालयातील बी. डी. पाटील, आर.आर.भोये, व्ही. आर.आव्हाड, आगळे व इतर काही कर्मचारी सेवानिवृत्त असून व त्यापैकी काहींवर अपहारप्रकरणी कारवाई प्रस्तावित असूनही विनय येडगे यांनी या कर्मचा-यांना विपणन निरिक्षक, प्रतवारीकार, केंद्रप्रमुख अशा पदांवर नियुक्ती दिलेली आहे. यापैकी काही कर्मचारी निलंबित असून एक कर्मचारी महामंडळाविरोधात न्यायालयात गेलेला असतांनाही येडगे यांनी कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे हाताळणे, आर्थिक नोंदी करणे ,हुंड्या काढणे आदि नियमभंग करणारी जबाबदारी या कर्मचा-यांवर सोपवल्याने मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शेतकरी नसलेल्यांच्या नावावर बोगस भात खरेदी करणे, रिकाम्या पोत्यांची परस्पर विक्री करणे, भाताची अवाजवी खरेदी दाखवणे,अधिकारी-कर्मचारी- संस्था व संस्था प्रतिनिधी यांनी संगनमताने शासनाच्या करोडो रुपयांचा अपहार करणे असे आरोप करत शहापूरमधील शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांची अवैध माया जमवणा-या मुरबाड ,किन्हवली ,शहापुर च्या अधिकारी,सहकारी संस्थांच्या सचिव, -कर्मचारी-दलालांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याप्रकरणी  प्रभारी अधिकारी विनय येडगे यांच्याशी संपर्क केला असता तुम्ही माझ्या कार्यालयात शहापुर ला या फोन वरून माहिती देता येणार नसल्याचे सांगितले .
----------------------------------------------------------------------------------------------------------
" वरिष्ठ अधिका-यांच्या करणे दाखवा नोटीसांना केराची टोपली दाखविणा-या, शेतक-यांच्या नावाने करोडो रुपयांचा अपहार करणा-या आदिवासी विकास महामंडळातील अधिकारी व कर्मचा-यांची उच्चस्तरीय व गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी व्हावी अशी मागणी मी केली आहे. "
                              बबन हरणे,सामाजिक कार्यकर्ते, शहापूर/मुरबाड


Post a Comment

 
Top