0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |  

शाळेच्या वर्गाचं प्लॅस्टर कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागात झुलेलाल ट्रस्टची शाळा आहे. या शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील क्लासरूम नंबर 24 मध्ये आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली, यावेळी वर्गात इयत्ता दहावीचे 52 विद्यार्थी उपस्थित होते.वर्गात शिक्षिका शिकवत असतानाच अचानक खिडकीजवळ सिलिंगचं प्लॅस्टर विद्यार्थिनींच्या डोक्यात कोसळलं. या घटनेत तीन विद्यार्थिनींच्या डोक्यात आणि चेहऱ्याला दुखापत झाली. ही संपूर्ण घटना वर्गात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती.

Post a Comment

 
Top