0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. यामध्ये 13 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीचा पहिला मान काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटीलांना देण्यात आला होता. त्यांनी यावेळी कॅबिनेट मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये प्रकाश मेहतांसह सहा मंत्र्यांना मंत्र्यांची नावे आहेत. प्रकाश मेहतांसह राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अमरिष अत्राम यांना यंदाच्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. या मंत्र्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे सादर केले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी ते स्विकारले आहेत.‘एसआरए’ घोटाळा प्रकरण प्रकाश मेहतांना भोवले आहे. यामुनळेच त्यांचे मंत्रिपद काढून घेतल्याच्या चर्चा आहेत. एम. पी. मिल कंपाऊंड एफएसआय घोटाळ्यात लोकायुक्तांनी  राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनादोषी ठरवले होते. यामुळे आज रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना डच्चू मिळाला आहे.

Post a comment

 
Top