0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली ।

भारतीय हवाई दलासंबंधीत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हवाई दलाचे एएन-32 हे विमान बेपत्ता झाले होते. 3 जून रोजी आसामच्या जोरहाटमधून अरुणाचल प्रदेशला जाण्यासाठी विमानाने उड्डाण घेतले. यानंतर ते बेपत्ता झाले होते. आता हे विमान अरुणाचलमध्ये सापडले आहे.उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात भारतीय हवाई दलाचे एएन-32 हे विमान सोमवारी आसाममध्ये चीनच्या हद्दीलगत बेपत्ता झाले होते. महत्त्वाचे म्हणजे या विमानात एकुण तेरा लोक होते. आसामातील जोरहाट येथून हे विमान अरुणाचल प्रदेशात जात होते. अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथील तळावर ते दुपारी दीड वाजता पोहोचणे अपेक्षित होते. दुपारी 12.25 वाजता या विमानाने उड्डाण घेतले. यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांचा त्याच्याशी दुपारी 1 वाजता संपर्क झाला. मात्र त्यानंतर या विमानाशी संपर्क होऊ शकलेला नव्हता.

Post a Comment

 
Top