0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - सांगली

सांगलीच्या कृष्णा नदीच्या बायपास पुलावरून एका तरुणीने नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज दुपारी 2 च्या सुमारास घडली आहे. या तरुणीची अद्याप ओळख पटली नसून पोलिसांनी तातडीने धाव घेऊन सदर तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने सांगली इस्लामपूर बायपास पुलावरून थेट नदी पात्रात उडी घेतली. यामध्ये सदर तरुणी ही पाण्यात न पडता पुलाच्या पिलरच्या कट्टयावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पुलावरून जाणाऱ्या काही लोकांनी ही घटना पोलिसांना काळवताच सांगली शहर पोलीस तसेच आयुष्य हेल्पलाईन टीमने तातडीने नदी पात्राकडे धाव घेतली.

Post a Comment

 
Top