0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या तारखेची अफवा पसरली होती. अखेर शनिवारी, 8 जूनला 10 वीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे.

   बारावीनंतर आता दहावीचे विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच SSC म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालान्त परीक्षा अर्थात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवरून जाहीर होईल. दरम्यान, गेल्या वर्षीपेक्षा यंदा बारावीचा निकाल दोन दिवस आधी म्हणजे 28 मे रोजी लागला. त्यामुळे दहावीचा निकालही यंदा लवकर लागणार असल्याचे सांगितले जात होते.

Post a Comment

 
Top