0

By : कुणाल शेलार : - युवा महाराष्ट्र लार्इव्ह - 


“अंबर भरारी” या संस्थेतर्फे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही “अंबरनाथ चित्रपट महोत्सव” अंबरनाथ मध्ये साकार होणार आहे . हे या महोत्सवाचे दुसरं वर्ष आहे . ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत प्रदर्शित , अप्रदर्शित चित्रपटांना तसेच लघुपट, माहितीपट, आमंत्रित करून मान्यवर परीक्षकांच्या वतीने २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत चित्रपट पहिले जातील . 

चित्रपटांच्या पुरस्कारांचे नामांकन ६ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील आणि २७ नोव्हेंबर रोजी अंबरनाथ चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल . लघुपटासाठी यंदा “अवयव दान , देहदान” या बदल जागृती निर्माण करणारे लघुपट पाठवावे इतर कोणत्याही विषयावर वरील लघुपटांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी . या चित्रपट महोत्सवाचे मुख्य आयोजक अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आहेत....आणि महेंद्र पाटील व निखील चौधरी आणि डॉ. राहुल चौधरी या फेस्टिवलचे दिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत

Post a comment

 
Top